वासोटा किल्ला
- नाव - वासोटा (व्याघ्रगड)
- उंच - ४२६७ फूट्
- प्रकार - वनदुर्ग
- ठिकाण - सातारा,महाराष्ट्र
- डोंगररांग - महाबळेश्वर कोयना
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेत विसावलेला वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचाआवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या घनता जंगलामधील का अनोखा किल्ला आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वर पासून दातेगडापर्यंत पसरलेली आहे. दोन्ही रांगाच्या मधून नदी वाहते. जावळी खोऱ्यामधून वाहणार्या कोयना नदीवर धरण बांधण्यात आले आहे. हे पाणी तापोळा पर्यंत पसरलेले आहे.सह्याद्री मुख्य रांग आणि शिवसागरचे पाणी आहे..त्यामधील भागात दाट जंगल आहे. पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलागकडे आणि पूर्वेला घनदाट जंगल त्यामुळे वासोटा किल्ल्याची दुर्गमता वाढली आहे.
वासोटा किल्ला इतिहास:-
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्या शिष्याने डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले असे म्हणतात. वसिष्ठ चे नाव बदलून वासोटा झाले अशी कल्पना आहे. शिलाहार कालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. पेशवाईत सुद्धा दुर्गमता बद्दल नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर" तुरुंग" म्हणून केला जात असे. कारण येथील घनदाट जंगल व निर्जन जागा तसेच वाघ, बिबट्या यासारखे प्राणी होते, अजूनही आहेत.
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासच्या अनेक किल्ले घेतले, वासोटा थोडा लांब असल्यामुळे तो घेतला नाही. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते तेव्हा त्यांनी आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून 6 जून 1660 वासोटा किल्ला जिंकला.अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितलं नाही म्हणून इंग्रजांच्या अधिकाऱ्याला अटक केली व त्याला वासोट्यावर कैद केले. काही दिवसांनी किल्ल्यावर 26000 रुपये सापडले. पुढच्या काळात 1706 मध्ये ताई तेलिणीबरोबर लढाई केली. 8 ते 10 महिन्यांच्या युद्धानंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या कडे गेला.
एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे.
"श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;
तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा".
वासोटा किल्ल्यावर पहावयाची ठिकाणे:-
किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा पडलेल्या अवस्थेत आहे. या दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो. आत गेल्यानंतर मारुती मंदिर आहे . मंदिरापासून तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरती जाते. बाजूची जाणारी वाट ' काळकाईच्या ठाण्याकडे' जाते. तिथून पुढे जाणारी वाट माचीवर जाते. या माचीला काळकाईचे ठाणे म्हणतात.
माचीवरून आजूबाजूचा घनदाट झाडां चा प्रदेश चकदेव, रसाळ, सुमार, महिपत गड, कोयनेचा जलाशय हा देखावा अतिशय सुंदर व रमणीय आहे. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही वाट पुढे जंगलात जाते आणि बाबू कड्यापाशी येऊन पोहोचते. समोर लक्ष वेधून घेणा रा उंच डोंगर म्हणजे " जुना वासोटा ". आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट जंगल आणि प्राणी असल्याने तेथे कोणी जात नाही.
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी चे रस्ते:-
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे नागेश्वर मार्गे दुसरा थेट वाटेकडे.
सातारा मार्गे वासोटा:-
कुसापूर मार्गे:- साताऱ्याहून बामनोली या गावी यावे लागते. सकाळी नऊ वाजता साताऱ्याहून बसची सोय आहे. येथून कुसापूर ला कोयना धरणाचा जलाशय लॉंचने जावा लागतो. कुसा पूर मधून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवी कडील वाट नागेश्वर कडे होते व डावीकडे जाणारी वाट वासोटा किल्ल्यावर जाते.
खीरकडी मार्गे:- साताऱ्याहून बसणे " वाघालि देवाची" ह्या गावी यावे, तिथून लॉंचने जलाशय पार करून खीरकडी या गावी यावे. तेथून धनगर वाडी पासून जाणारी वाट" मेट इंदवली" या गावात जेवण जाते. साताऱ्यापासून इथपर्यंतचा प्रवास 8-9 तासांचा आहे. इथून पुढे 5-6 तासात वासोट्यावर जाता येते.
महाबळेश्वर मार्गे:- महाबळेश्वर" तापोळे" गावी येऊन लॉंचने कुसापूर ला जाता येते. तेथून वासोट्याला जाते. चिपळूणहुन वासोटा
1. सकाळी 8:30 बसणे चोरवणे या गावी यावे. येथून 5-6 तासात वासोट्याला पोहोचता येते. या वाटेने वर गेल्यावर एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वर कडे जाते उजवीकडची वाट वाजता जाते. येथून वासोट्या चे अंतर दोन तासात कापता येते.
नागेश्वर मार्गे वासोटा:-
वासोट्यावर जाताना समोर एक सुळका दिसतो त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा आहे. त्यामुळे मध्ये महादेवाचे मंदिर आहे. हजारो नागरिक दर शिवरात्रीला येथे दर्शनास येतात.
वासोटा किल्ल्याचे फोटो :-